संजय पटलेना नगर परिषदेची नोटीस; प्रशांत समर्थ यांचा पुढाकार!

# पब्लिक पंचनामा इफेक्ट!
#संजय फ्लेम इमारतीला नगर परिषदेची नोटीस; प्रशांत समर्थ यांचा पुढाकार!


मूल | प्रतिनिधी

मूल नगर परिषदेच्या मालकीच्या जागेवरील कथित अतिक्रमणाचा मुद्दा पब्लिक पंचनामा ने बातमीद्वारे उजेडात आणल्यानंतर नगर परिषद प्रशासनाने संजय फ्लेमशी संबंधित इमारतीवर नोटीस चिकटवली आहे. या प्रकरणात नगर परिषदेचे बांधकाम सभापती प्रशांत समर्थ यांनी पुढाकार घेतल्याने या घडामोडीला महत्त्व प्राप्त झाले आहे. पब्लिक पंचनामाच्या वृत्तानंतर प्रशासनाची हालचाल सुरू झाल्याचे चित्र असून, आता पुढील कारवाईकडे मूलवासीयांचे लक्ष लागले आहे.

नगर परिषद मूलच्या मुख्याधिकाऱ्यांनी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी संबंधितांना नोटीस बजावली आहे.  अनधिकृत अतिक्रमण ताबडतोब काढून मूळ जागा करावी असे नोटिसात नमूद आहे

नोटिशीनुसार, शासकीय मालकीच्या जागेवर आवश्यक परवानग्या न घेता अनधिकृत बांधकाम केल्याचे निदर्शनास आल्याचे नमूद करण्यात आले आहे. नोटीस प्राप्त झाल्यानंतर संबंधित बांधकाम त्वरित काढून टाकावे आणि शासकीय जागा मूळ स्थितीत रिकामी करून द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच, आवश्यक प्रमाणपत्र प्राप्त केल्याशिवाय पक्के अथवा कच्चे बांधकाम करू नये, असे स्पष्ट करत नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित कायद्यांनुसार कारवाई करण्याचा इशाराही नोटिशीत देण्यात आला आहे.

पब्लिक पंचनामाने उपस्थित केलेला मुद्दा, प्रशांत समर्थ यांचा पुढाकार आणि नगर परिषद प्रशासनाने बजावलेली नोटीस यामुळे या प्रकरणाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. आता नोटिशीनंतर प्रत्यक्ष कारवाई होते का आणि संबंधित जागेची कायदेशीर स्थिती स्पष्ट होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!