विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय बेंबाळ येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी
विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय बेंबाळ येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी
मुल :-
तालुक्यातील विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय, बेंबाळ येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती दिनांक 02 ऑक्टोबरला उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. एस.एम. उमक होते. प्रमुख पाहुणे म्हणून रामकृष्ण शिक्षण प्रसारक मंडळ बेंबाळचे संचालक एन. जे. आरेकर उपस्थित होते. तसेच प्रा. एस. पी. सोनुले, प्रा. प्रतापगिरिवार, प्रा. जी. आर. सोपनकर, प्रा. एस. ए. रामटेके प्रा. ए. आर. कोरडे मॅडम यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा, स्वच्छता व शांततेच्या विचारांचे, तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा व ‘जय जवान, जय किसान’ या प्रेरणादायी विचारांचे स्मरण करण्यात आले. त्यांच्या कार्यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडावी, असा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमाची सांगता महापुरुषांना अभिवादन करून करण्यात आली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!