नवरगाव ची शिवटेकडी केली प्लास्टिक मुक्त,


(स्वाब संस्था आणि वन विभागाची स्वच्छता मोहीम)
सिंदेवाही:
सिंदेवाही वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या नवरगाव उप क्षेत्रातील प्रसिद्ध शिवटेकडी चा संपूर्ण परिसर स्वाब फाउंडेशन तथा वन विभाग यांच्यामार्फतिने वन्यजीव सप्ताहाचे अवचित साधत आज 2 ऑक्टोंबर ला स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छ करण्यात आला.
सविस्तर वृत्त याप्रमाणे की वन विभाग यांचा वन्यजीव सप्ताह निमित्याने सुरू असलेल्या अभिनव उपक्रमातील आज 2 ऑक्टोंबर रोजी स्वच्छता मोहीम राबवित सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील नवरगाव उप क्षेत्रात येणार्या नवरगाव परिसरातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ शिवटेकडी हा संपूर्ण परिसर संस्था व वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील संपूर्ण प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक बॉटल्स, जेवणानंतर लोकांनी ठेवलेल्या प्लास्टिक पत्रावळी, प्लास्टिक ग्लास, प्लास्टिक वाट्या, असा संपूर्ण प्लास्टिक कचरा उचलून त्याचा योग्य विल्यवाट लावून संपूर्ण स्थळ हा प्लास्टिक मुक्त करण्यात आला.
यावेळी स्वाब संस्थेचे स्वच्छता मित्र यश कायरकर, जीवेश सयाम, शरद गभने, जीवन गुरनुले, नितीन भेंडाळे, गणेश गुरनुले, गणेश गावतुरे, गिरीधर निकुरे, शुभम निकेश्वर, सुमित गुरनुले, वन विभागाचे नवरगाव व क्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक आर.आर. सिडाम, कु. प्राजक्ता चौधरी वनरक्षक नवरगाव, वनरक्षक कु. एम. बी. सुरपाम, वनरक्षक ओ.व्ही.चहांदे, एस. एन. नागरे वनरक्षक, तथा वन मजूर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!