नागरी माढेळीत 'सेल्फी विथ खड्डा' स्पर्धा; प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी अनोखी शक्कल

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - नागरी माठेळी भागातील रस्त्यांची झालेली दुर्दशा आणि ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. प्रशासनाचे या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आणि अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अभिजित कुडे यांच्या वतीने 'सेल्फी विथ खड्डा स्पर्धा' चे आयोजन करण्यात आले आहे.   
स्पर्धेत नागरिकांना माठेळी भागातील रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये उभे राहून किंवा खड्ड्यांसोबत सेल्फी घ्यायची आहे. घेतलेली सेल्फी सोशल मीडियावर #सेल्फी_विथ_खड्डा हा हॅशटॅग वापरून पोस्ट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकप्रतिनिधींच्या हस्ते होणार बक्षीस वितरण:

विशेष म्हणजे, या अनोख्या स्पर्धेतील विजेत्यांना बांधकाम अभियंता, आमदार आणि खासदार यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना रस्त्यांची भीषण वास्तवता कळावी हा यामागील मुख्य उद्देश आहे.  
या अनोख्या उपक्रमात नागरी माठेळीतील जास्तीत जास्त नागरिकांनी आणि तरुणांनी भाग घेऊन खड्ड्यांसोबतचे सेल्फी पोस्ट करावेत, असे आवाहन आयोजक सामाजिक कार्यकर्ते अभिजित कुडे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!