दहा फुटाच्या अजगरासह सात सापांना स्वाब संस्थेचे जीवदान.


(चालू वर्षात तळोधी, नागभीड, सिंदेवाही, वनपरिक्षेत्रातून अठ्ठावीस अजगरा सह, शेकडो विषारी, बिनविषारी सापांना संस्थेचे जीवदान)


नागभीड:
      परिसरातील तळोधी बाळापुर येथील नवानगर  असलेल्या अजगराला, तसेच परिसरातील इतर भागातून तीन नाग, धुर नागीन,डुरक्या घोणस, धामण अशा सापांना पकडून वन विभागाच्या मार्फतने जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले.
 सविस्तर वृत्त असे की, परिसरातील तळोधी बाळापुर येथील नवानगर भागातील दिनेश वाघदरे यांच्या घराशेजारील एका कोंबडीला पकडून असल्याचे निदर्शनास येतात परिसरातील लोकांद्वारे स्वाब संस्थेचे बचाव दल यांना या बाबतीत माहिती देण्यात आली. यानंतर स्वाब चे बचाव दल प्रमुख सर्पमित्र जिवेश सयाम, आदित्य नान्हे यांनी अजगराला सुरक्षित पकडून नंतर गांवकरी यांना अजगरा बद्दल माहिती दिली, माहिती सांगताना  बिनविषारी अजगर आणि विषारी घोणस यांच्यामधील फरक समजून सांगितला.  "गावालगत शेती परिसर आणि जंगल असल्याने हा साप गावात आला आणि अजगर साप हा घोणस प्रमाणेच थोड्याफार प्रमाणात दिसत असल्यामुळे बहुतांश लोक त्याला विषारी घोणस समजून मारून टाकतात. यामुळे या सापांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. आता अजगर हा संरक्षित प्राणी असून तो 'शेड्युल वन' मध्ये येत असल्याने त्याला वाचवणे गरजेचे आहे  त्यामुळे अजगराला मारणे चुकीचे आहे. तो अत्यंत कमी संखेत असल्यामुळे असा कुठलाही साप दिसला तर वन विभागाला किंवा आम्हाला कळवा, मारू किंवा स्वतः पकडण्याचा प्रयत्न करू नका." असे गावकऱ्यांना स्वाब संस्थेचे बचाव दल प्रमुख सर्पमित्र जिवेश सयाम यांनी सांगितले. 
   या अजगराची सोबतच परिसरातील विविध ठिकाणी पकडलेले तीन फुल साईजचे नाग,धामण, डुरक्या घोणस, धुडनागिन, अशा विषारी,बिनविषारी सापांची नोंद तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रात करून या सातही सापांना घोडाझरी येथील अभयारण्यात सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले.
यावेळी तळोदी चे वनपरिक्षेत्र अधिकारी तेजस सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत स्वाब संस्थेचे बचाव दल प्रमुख सर्पमित्र जिवेश सयाम, व अध्यक्ष यश कायरकर, शिक्षण विभाग प्रमुख नितीन भेंडाळे, संस्थेचे पदाधिकारी सर्पमित्र गणेश गुरनूले, आदित्य नान्हे, स्वराज मोहुर्ले, उपस्थित होते.
 "पावसाच्या दिवसात बिळात पाणी गेल्यामुळे आणि उंदीर , घुस सारखे प्राणी गाव शेतात येतात, यांच्या शोधात साप बाहेर येऊन गाव परिसरात शेत जंगलामध्ये उघड्यावर दिसून येतात, बिनविषारी सापांसोबतच घोणस सारखे साप बाहेर पडून रस्त्यावर, मोकळ्या जागेत व घराचे आसपास येतात, किंवा शेतावर काम करायला गेल्यानंतर शेतामध्ये कधीही समोर येऊ शकतात त्यामुळे सावधानता बाळगावी व काळजी घेत स्वतःचे यापासून संरक्षण करावे, जर घर परिसरात साप आढळल्यास घाबरून जाऊ नये व त्या सापाला मारण्याऐवजी सर्पमित्रांनाच प्राचारण करावे. सर्प दंश झाल्यास कोणत्याही मांत्रिका कडे जाऊन आपला जीव गमावण्याऐवजी शासकीय रुग्णालयात जाऊन औषधोपचार करावा. (सापाचा जहर प्रतिरोधक) अँटिस्नेकव्हेनन्स घ्याव्या." असे या संदर्भात यश कायरकर यांनी सांगितले.
         विशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणे यावर्षी पावसाळ्यात स्वाब संस्थेच्या बचाव दलाच्या वतीने सर्पमित्र जीवेश सयाम,यश कायरकर, महेश बोरकर, जीवन गुरनुले, गणेश गुरनुले, आदित्य नाणे, गणेश गावतुरे, या संस्थेच्या सर्पमित्रांनी नागभीड- शिंदेवाही-  ब्रह्मपुरी,तालुक्यातून विविध ठिकाणी पकडलेल्या शेकडो विषारी- बिनविषारी सापासोबत यावर्षी पावसाळ्यातच 28 अजगरांना वन विभागात नोंद करून सुरक्षित ठिकाणी सोडून जीवदान दिले. परिसरात संस्थेच्या कार्याबद्दल लोकांना कौतुक केल्या जात आहे.
मात्र यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यश कायरकर यांनी  समाजात सर्पमित्रांंबद्दल आणि सापाबद्दल जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. लोकांमध्ये वन विभागाद्वारे सर्पमित्रांना मानधन मिळतो अशी अंधश्रद्धा पसरलेली आहे मात्र तसे कुठलेही मानधन मिळत नाही. सर्पमित्रांना लांबून बोलल्यानंतर त्यांना ज्यांच्या घरी साप निघाला आहे त्यांनी पुरेसा इंधन भाडा देणे गरजेचे आहे. जेणेकरून सर्पमित्रांना आर्थिक ताण सहन करावा लागणार नाही आणि हे सापांना वाचवणे आणि शेतकऱ्यांना लोकांना मदत करण्याचे कार्य सुरळीत चालूच राहील, असे आवाहन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!