मूलमध्ये ‘भव्य मंगळागौरी स्पर्धा २०२६’चे आयोजन


आमदार सुधीरभाऊ सांस्कृतिक महोत्सवांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन; भाजपा महिला आघाडी, मूलचा पुढाकार
मूल | प्रतिनिधी :
मंगळागौरीच्या पारंपरिक संस्कृतीला आणि महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने भव्य मंगळागौरी स्पर्धा २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. आमदार सुधीरभाऊ सांस्कृतिक महोत्सवांतर्गत होणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन भाजपा महिला आघाडी, मूल यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या स्पर्धेत विविध वयोगटांसाठी स्वतंत्र गट ठेवण्यात आले आहेत. दुर्गा गटासाठी ४५ वर्षांवरील, सरस्वती गटासाठी ३५ वर्षांवरील, तर शारदा गट आणि बालिका गटासाठी १५ वर्षांखालील सहभागींसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकासाठी ₹५,००१, द्वितीय ₹३,००१, तृतीय ₹२,००१ आणि चतुर्थ क्रमांकासाठी ₹१,००१ अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
याशिवाय ‘माय लेक नृत्य स्पर्धा’ आणि ‘रिल स्पर्धा’ देखील आयोजित करण्यात आली असून, माय लेक नृत्य स्पर्धेत प्रथम ₹३,००१, द्वितीय ₹२,००१ आणि तृतीय ₹१,००१ पारितोषिक देण्यात येणार आहे. रिल स्पर्धेसाठी प्रथम ₹५,००१, द्वितीय ₹३,००१, तृतीय ₹२,००१ आणि चतुर्थ ₹१,००१ अशी पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे सर्व स्पर्धांसाठी प्रवेश निःशुल्क ठेवण्यात आला आहे. मंगळागौरीच्या पारंपरिक खेळ, नृत्य आणि सांस्कृतिक परंपरेला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमामुळे महिलांसह बालिकांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
भाजपा महिला आघाडी, मूल यांच्या पुढाकाराने आयोजित या महोत्सवातून स्थानिक महिला व मुलींना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!