दिला शब्द... केला पूर्ण! मूल–नागपूर थेट बससेवा सुरू
मूल : मूल शहर व तालुक्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली मूल–नागपूर थेट एसटी बससेवा अखेर सुरू झाली आहे. आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी नागरिकांची मागणी गांभीर्याने घेत परिवहन विभागाकडे ठामपणे पाठपुरावा केल्याने या मागणीला यश मिळाले आहे.
मूल–नागपूर थेट बससेवा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थी, रुग्ण, महिला, ज्येष्ठ नागरिक, कर्मचारी, व्यापारी तसेच विविध कामांसाठी नागपूरला जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन भाजपा मूल शहराध्यक्ष प्रविण मोहुर्ले यांनी आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती.
या मागणीची तातडीने दखल घेत आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी परिवहन विभागाकडे पाठपुरावा केला. मूल–नागपूर बससेवा सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर आता बससेवा सुरू झाल्याने मूल शहर व तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
“दिला शब्द... केला पूर्ण!” या भावनेतून मूलकरांच्या दैनंदिन प्रवासाशी जोडलेला महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला आहे. या बससेवेमुळे नागपूरला शिक्षण, उपचार, रोजगार, व्यवसाय व शासकीय कामांसाठी जाणाऱ्या नागरिकांची मोठी सोय होणार आहे.
बससेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे मूल शहर व तालुक्यातील नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
— प्रविण मोहुर्ले
भाजपा शहराध्यक्ष, मूल



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!