मुल येथे उद्या सर्वधर्मीय गणेश महाआरतीचे आयोजन
मुल, दि. २५ सप्टेंबर २०२६ : गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सर्वधर्मीय ऐक्याचा संदेश देण्यासाठी मुल शहरात उद्या, शनिवार दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी सर्वधर्मीय गणेश महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
मुल शहरातील गांधी चौक येथील श्री अष्टविनायक युवा गणेश मंडळ येथ विशेष महाआरतीचे आयोजन करण्यात आले असून, दुपारी ३ वाजता महाआरती संपन्न होणार आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणत सामाजिक सलोखा आणि परस्पर बंधुभाव वृद्धिंगत करण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे.
या महाआरतीला आमदार तथा माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तसेच भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हरीशजी शर्मा यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजातील विविध घटकांना एकत्र आणणारा उत्सव ठरावा, या उद्देशाने सर्वधर्मीय महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन गणरायाचे दर्शन व महाआरतीचा लाभ घ्यावा, तसेच सामाजिक एकतेचा संदेश अधिक दृढ करावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
गांधी चौक परिसरात होणाऱ्या या सर्वधर्मीय महाआरतीसाठी मुल शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष प्रविण मोहुर्ले यांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!