बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार
दोन तास तणावाचे वातावरण
अर्जुनी येथे वारंवार होत आहे बिबट्याचा हल्ला
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - वरोरा तालुक्यातील शेवटच्या टोकावर असणाऱ्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प लगत असलेल्या अर्जुनी येथे बुधवार ला सायंकाळी सात वाजता च्या दरम्यान वनविभागाच्या निवासस्थान जवळ जयश्री दाते यांच्या दारात बांधून असलेल्या बकरीला बिबट्याने ठार केल्याची घटना घडली आहे.
अर्जुनी तु. हे गाव ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प लगत येत असून मागील चार ते पाच महिन्यापासून या परिसरात वाघ, तसेच बिबट्याचा वावर असून गावातील जनावरे, पाळीव कुत्रे आतापर्यंत ठार केल्याची घटना घडली असून बुधवार ला सायंकाळी सातच्या दरम्यान जयश्री किशोर दाते यांची शेळी ठार केली.
जयश्री दाते घरी नसल्यामुळे मुले थोडक्यात बचावले
जयश्री दाते ही बाहेरगावी गेल्यामुळे दोन्ही मुले ही दुकानात असल्यामुळे बिबट्याने शेळीवरच हमला करत ठार केले,मात्र घरामध्ये कोणी असते तर मोठी जीवित हानी होण्याची शक्यता निर्माण झाली होती, त्यामुळे गावातील नागरिकांनी वारंवार गावात वाघ व बिबट येत असल्याची सूचना वनविभागाला देऊन सुद्धा दुर्लक्ष केल्यामुळे मोठ्या प्रमाणात जनतेचा आक्रोश निर्माण झाले असुन
यावेळी काही वेळानंतर जनतेला विश्वासात घेत वनविभागाकडून घटनास्थळ पंचनामा करत ठिकठिकाणी गस्त वाढवण्यात आली असुन जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बैठक घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.
यावेळी उपस्थित क्षेत्र सहाय्यक कामाटकर,वनरक्षक वगारे, जुडे, वसुरे, गावातील उपसरपंच,पोलीस पाटील, ptr टिम वन मजूर सहीत गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!