महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ नागभीड तालुका सोशल मिडीया अध्यक्ष पदी प्रा. दिवाकर कामडी यांची नियुक्ती
तळोधी बा-महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई, जिल्हा शाखा चंद्रपूर च्या वतीने विश्राम गुह, बाधंकाम विभाग मुल येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे राज्य अध्यक्ष प्रा. महेश पानसे, जिल्हा अध्यक्ष शंकर बोरघरे व सोशल मिडीया जिल्हा अध्यक्ष व कायदेशीर सल्लागार ऍड. राहुल थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात नागभीड तालुका सोशल मिडीया अध्यक्ष पदी प्रा. दिवाकर कामडी यांची निवड करुन अभिनंदन करण्यात आले. यावेळी नागभीड, तळोधी, भद्रावती, राजुरा, चंद्रपूर, चिमूर, बल्लारपूर येथील तालुका अध्यक्ष उपस्थित होते. सर्वांनी नवनियुक्त तालुका अध्यक्षाचे पुष्पगुछ देऊन अभिनंदन केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!