आंतरशालेय जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत लोकविद्यालयाचे सुयश.


डिंपल खोबरागडेची विभागीय स्पर्धेसाठी निवड; नागपूर येथे करणार चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व

तळोधी (बा.), दि. २४ ऑगस्ट २०२६ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय (महाराष्ट्र राज्य), पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्या अंतर्गत आंतरशालेय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथे नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेत लोकविद्यालय, तळोधी (बा.) येथील विद्यार्थिनी कु. डिंपल टुमदेव खोबरागडे हिने उत्कृष्ट कामगिरी करत विभागीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे.

नागपूर येथे होणाऱ्या विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत डिंपल चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेच्या वतीने व लोकविद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक प्रकाश बुराडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन तिचे अभिनंदन करण्यात आले. तसेच विभागीय स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा देण्यात आल्या.

डिंपलने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, मुख्याध्यापक, बुद्धिबळ प्रशिक्षक संतोष नन्नावार व क्रीडा प्रशिक्षक अजय सगळाम यांना दिले.

“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात यश संपादन करून विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड होणे ही अभिमानाची बाब आहे,” अशी प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली.

डिंपलच्या या यशाबद्दल दि रुरल एज्युकेशन सोसायटी, ब्रह्मपुरी (सन १९६०) चे अध्यक्ष श्री. व्ही. एस. तोंडरे, सचिव श्री. आर. एस. राऊत, व्ही. एस. बगमारे, ए. आर. नागमोती, ए. एस. राऊत, डी. पी. समर्थ, गटशिक्षणाधिकारी संजय पालवे, केंद्रप्रमुख भारत बोरकर,मुख्याध्यापक पी.एल. बुराडे, ,ए.एन.कोहळे,आर.एम.निनावे
 पी.एल. इजकापे, सोनल उंबरकर, स्नेहा गोहने, प्रीती डंभारे,स्वाती बागडे, रीना चचाने,प्रीती वाघाडे, शिशिर कोरेकर,अक्षय सुकारे, एकनाथ भगत,सिद्धेश वैरकर, उमदेव बगमारे,रीना चचाने, संजय शेंडे, सुरेश कुंभरे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!