पोळा-तान्हा पोळा गणेश चतुर्थी सण शांततेत पार पाडण्यासाठी सराईत गुन्हेगारांना पोलिसांचे मार्गदर्शन

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे पोळा व तान्हा पोळा गणेश चतुर्थी या सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच कोणत्याही प्रकारे शांततेचा भंग होऊ नये, यासाठी चिमूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात आज दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी भिसी, चिमूर व शेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधकात्मक कारवाई तसेच मार्गदर्शन सभा घेण्यात आली.
ही सभा उप पोलीस अधीक्षक, चंद्रपूर ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे (चिमूर), चिमूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, भिसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मंगेश भोंगाडे तसेच शेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेंद्रसिंह यादव उपस्थित होते.
यावेळी संबंधित सराईत गुन्हेगारांना सण-उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत योग्य मार्गदर्शन करण्यात आले. पोळा व तान्हा पोळा सणादरम्यान कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य, भांडण, मारामारी किंवा शांततेचा भंग होणार नाही, याबाबत पोलिसांकडून स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
सण उत्साहात साजरा करा, मात्र कायदा हातात घेऊ नका, असा संदेश पोलिस अधिकाऱ्यांनी यावेळी दिला. पोलिस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे पोळा व तान्हा पोळा सण शांततामय वातावरणात पार पडण्यास मदत होणार आहे.

चिमूर उपविभागीय पोलीस प्रशासनाकडून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!