अल्पवयीन वाहनधारकावर शेगाव पोलिसांकडून कारवाई

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - अल्पवयीन मुलांकडून होणारे बेकायदेशीर वाहन चालविने रोखण्यासाठी शेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने विशेष नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान दुचाकी चालविताना आढळलेल्या अल्पवयीन वाहनचालकांच्या मोटारसायकली ताब्यात (डिटेन) घेण्यात आल्या.

कारवाईनंतर संबंधित अल्पवयीनांच्या पालकांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून त्यांचे समुपदेशन मार्गदर्शन करण्यात आले. अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्याचे धोके, वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व तसेच अपघातांमुळे होणारे गंभीर परिणाम याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

तसेच संबंधितांवर मोटार वाहन कायद्यान्वये आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात आली. पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये व वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेंद्रसिंह यादव यांनी केले.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक पोले,वाहतूक पोलीस प्रफुल कांबळे, केकान, asi गायकवाड यांनी केली. अल्पवयीनांकडून होणारे वाहनचालन रोखण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे यावेळी शेगाव पोलिसांकडून सांगण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!