आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना नोटबुक व पेनचे वाटप
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
पोंभूर्णा | प्रतिनिधी
बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा राज्याचे माजी अर्थ व नियोजन मंत्री मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार, दि. ३ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सातारा कोमटी, सातारा भोसले आणि सातारा तुकूम येथे विद्यार्थ्यांना नोटबुक व पेनचे वाटप करण्यात आले.
हा उपक्रम माजी सरपंच श्री. प्रवीण चिचघरे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे महत्त्व, त्याचा योग्य उपयोग आणि शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या दीर्घायुष्याची सदिच्छा व्यक्त केली.
कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या महामंत्री कु. अलकाताई आत्राम, पोंभूर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री. राकेश गव्हारे, श्री. रवींद्र गेडाम, भाजप कार्यकर्ते श्री. जनार्दन सातपुते, श्री. दिनेश निकुरे, श्री. राकेश मडावी, श्री. राजू मडावी तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सातारा कोमटीचे मुख्याध्यापक श्री. नन्नावरे, श्री. नंदनवार, सातारा भोसले येथील मुख्याध्यापिका सौ. खोडके, श्री. उराडे, सातारा तुकूम येथील सहाय्यक शिक्षक श्री. चिवंडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करून शिक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला. स्थानिक नागरिकांनी या सामाजिक उपक्रमाचे स्वागत करून आयोजकांचे अभिनंदन केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!