आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासकामांनी प्रेरित होऊन अल्पसंख्याक युवकांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
मुल : आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मतदारसंघात राबविलेल्या विविध विकासकामांमुळे प्रेरित होऊन मुल शहरातील अल्पसंख्याक समाजातील अनेक युवकांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा धनश्री बँकेतील डॉ. हेडगेवार सभागृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
भाजप नेते रज्जू भाई कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या प्रवेश सोहळ्यात युवकांनी भारतीय जनता पक्षाची विचारधारा व विकासाभिमुख कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत पक्षात प्रवेश केला.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष हरिषजी शर्मा, संघटन मंत्री रामजी लखीया, भाजप नेते ब्रिजभूषण पाझारे, काशिनाथ सिंग, शहराध्यक्ष प्रवीण मोहूर्ले, ग्रामीण अध्यक्ष चंदू मारगोनवार, अजय गोगूलवार तसेच प्रा. डॉ. सौ. किरण कापगते यांची प्रमुख उपस्थिती होती. शेकडो कार्यकर्त्यांच्या साक्षीने हा प्रवेश सोहळा उत्साहात संपन्न झाला.
यावेळी इम्रान सिद्दीकी, अक्रम पठाण, दानिश शेख, समीर शेख, साहिल सय्यद, हसनैन सिद्दीकी, उबेद शेख, तोहीद शेख, यासीर खान, रमझान शेख, रझा दलाल आदी युवकांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करून पक्ष बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या प्रवेशामुळे मुल शहरात भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बळात अधिक वाढ होणार असल्याची भावना उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!