युवा सेवा समितीकडून चिरोलीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
युवा सेवा समितीकडून चिरोली जिल्हा परिषद शाळेतील प्रथम वर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
चिरोली : सामाजिक बांधिलकी जपत युवा सेवा समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्हा परिषद शाळा, चिरोली येथील इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.
या उपक्रमात आदित्य कामीडवार, तक्षू वनकर, शुभम गोंगले, अंकुश सूत्रपवार, अक्षय आसमवार, गणेश रायपकवार, धम्मा दहिवले आणि जय कुंभारे या युवकांनी सक्रिय सहभाग घेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण केले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने राबविण्यात येणाऱ्या या स्तुत्य उपक्रमाचे पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांकडून कौतुक होत असून, युवकांच्या सामाजिक जाणिवेचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. भविष्यातही अशाच प्रकारचे लोकहिताचे उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!