सामाजिक कार्यकर्ते रजत राऊत जिल्हास्तरीय युवा पुरस्काराने सन्मानित होणार

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते रजत राऊत यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना जिल्हास्तरीय युवा पुरस्कार 2026 (सामाजिक क्षेत्र) प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांच्या या निवडीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसार, "सन्मान द्या, सन्मान घ्या" या सामाजिक उपक्रमांतर्गत पत्रकार संजीव भांबोरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त दि. 9 जून रोजी पहेला येथे भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत रजत राऊत यांचा गौरव करण्यात येणार आहे.

या प्रसंगी माजी खासदार खुशाल बोपचे, अभिनेते अश्विनकुमार बघाले, अभिनेत्री चैताली भष्मे तसेच दैनिक माझा मराठवाडाचे मुख्य संपादक दशरथ सुरडकर यांच्या हस्ते रजत राऊत यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व जिल्हास्तरीय युवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

रजत राऊत यांनी शिक्षण, सामाजिक जनजागृती, युवक मार्गदर्शन तसेच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजासाठी केलेले कार्य उल्लेखनीय असून त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

रजत राऊत यांची जिल्हास्तरीय युवा पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांच्या मित्रपरिवार, सामाजिक क्षेत्रातील सहकारी तसेच नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!