NMMS परीक्षेत पवनीच्या 'गुरुकुल CPS क्लासेस'चा झेंडा;‌जिल्ह्यात प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकासह २२ विद्यार्थी उत्तीर्ण!

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दि.२५/०४/२०२६  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे डिसे. २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत (NMMS) पवनी येथील गुरुकुल CPS क्लासेसने देदीप्यमान यश संपादन केले आहे. या क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी भंडारा जिल्ह्यात प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांकावर आपली मोहोर उमटवत यशाची परंपरा कायम राखली आहे.यावर्षी या क्लासेसचे एकूण २२ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले असून, त्यापैकी ८ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे.विशेष म्हणजे,गुणवत्ता यादीत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास शासनाकडून ४८,००० रुपये शिष्यवृत्ती‌ मिळणार आहे.जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत 'गुरुकुल'चे वर्चस्व:
श्रेयशी विवेक चव्हाण जिल्ह्यात प्रथम,ओम बावनकर द्वितीय,उन्नत पडोळे तृतीय याव्यतिरिक्त रेणू मोहाडीकर हिने SBC प्रवर्गात जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावून विशेष यश मिळवले आहे.श्लेषा दहिवले,सुमेध भांडारकर,स्वयंम धनंजुळे आणि अमन अंबादे या विद्यार्थ्यांनीही गुणवत्ता यादीत आपले स्थान निश्चित केले आहे.ग्रामीण भागातील गुणवंतांची भरारी: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळविलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.सातत्यपूर्ण सराव,योग्य नियोजन आणि विषयांची सखोल तयारी हेच या यशाचे गमक असल्याचे यशस्वी विद्यार्थ्यांनी सांगितले. "विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचे सहकार्य आणि आमच्या शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळेच जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत पहिल्या तिन्ही क्रमांकांवर झेप घेणे शक्य झाले आहे. ग्रामीण भागातील मुलांमध्ये प्रचंड टॅलेंट आहे,त्यांना फक्त योग्य दिशा देण्याचे काम आम्ही करतोय." रवी भिसेकर (संचालक,गुरुकुल CPS क्लासेस,पवनी) या यशाबद्दल परिसरातील नागरिक, शिक्षक आणि शिक्षणप्रेमींकडून विद्यार्थ्यांचे आणि क्लासेसच्या मार्गदर्शकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.भविष्यातील वाटचालीस सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!