सरस्वती प्राथमिक शाळेत निरोप समारंभ संपन्न

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दि.०७/०४/२०२६
स्थानिक सरस्वती प्राथमिक शाळा पवनी येथे महा सरस्वती पुजन व इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत उत्साहात आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. शालेय जीवनातील पहिल्या टप्प्याला पूर्ण करून पुढील शिक्षणाकडे पाऊल टाकणाऱ्या चिमुकल्यांना यावेळी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
मान्यवरांची उपस्थिती व मार्गदर्शन:
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सुरेश केवटे तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे पदाधिकारी विशाखा सहारे, सुनील साखरे आणि तेजस्विनीताई पारधी‌ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "यशस्वी होण्यासाठी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी येणाऱ्या आव्हानांना धैर्याने सामोरे जावे." यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
विद्यार्थ्यांचा सत्कार व भेटवस्तू:
कार्यक्रमाची सुरुवात महा सरस्वती पूजनाने करण्यात आली.इयत्ता चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प‌ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.शाळेच्या आठवणी जपून ठेवण्यासाठी संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या.निरोपाच्या क्षणी विद्यार्थी व शिक्षकांमध्ये एक भावनिक नाते पाहायला मिळाले.
सहकार्य व आभार:
कार्यक्रमाच्या सांगतेनंतर सर्व विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात आले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार शिक्षक ज्ञानेश्वर सहारे यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका ममता मुंडले,लता बरसागडे,माधुरी काटेखाये,सरोजनी नंदेश्वर,तसेच अंगणवाडी सेविका कविता बावनकर आणि मदतनीस कुसुम नागपुरे,मनोरमा सयाम यांनी मोलाचे सहकार्य केले.कार्यक्रमाला पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!