काटेझरी,भानुसखिंडी वनरक्षकांचा निवासस्थानाचे उद्घाटन संपन्न
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर अंतर्गत येत असलेल्या वनपरिक्षेत्र कार्यालय वडाळा अंतर्गत उपक्षेत्र काटेझरी,तसेच भानुसखिंडी येथील वनरक्षक नवीन निवासस्थानाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
यावेळी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक (कोर) रेड्डी, तसेच सहाय्यक वनसरक्षक नातु (कोर )यांच्या हस्ते पार पडले खुटवंडा येथे चार युनिटचे बांधकाम असून स्टेट कॅम्प योजनेतून हे बांधकाम करण्यात आले आहे तर अर्जुनी येथे दोन युनिट असून राज्य योजनेतून बांधकाम करण्यात आलेले आहे.
यावेळी उपस्थित ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोअर वडाळा वनपरिक्षेत्र अधिकारी चिवंडे, क्षेत्र सहाय्यक कामटकर, ननावरे, वाटकर, वनरक्षक ताडोबा जुडे, वगारे ,लटपटे,जोनकले,
बोनगीलवार मँडम राजगडे मँडम वसुरे,बोंबे, कुठीमजूर अग्नीरक्षक यावेळी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!