नप चे बंद जलतरण तलाव सुरू करा- जलतरण संघटनेची मागणी
नप चे बंद जलतरण तलाव सुरू करा- जलतरण संघटनेची मागणी
विद्यार्थ्यांच्या सुट्ट्यांमध्येही दुर्लक्षित आहे जलतरण तलाव
आपल्या क्षेत्राचे आमदार माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा करीत मुल येथील जलतरण संघटनेने सुधीरभाऊ ना जलतरण तलावसाठी साकडे घातले, सुधीरभाऊनी निधी मंजूर करून दिला, लोकार्पण झाले, शहरातील नागरिक, महिला, विद्यार्थी हे व्यायामासाठी त्याचा वापर करायला लागले, सिंदेवाही, सावली, पोंभुरणा, गोंडपीपरी अश्या आजूबाजूच्या तालुक्यातून सुद्धा विद्यार्थी स्पर्धेच्या प्रॅक्टिस करीता सदर जलतरण तलावात येत असत, मागील काही दिवसांत मात्र सदर शासनाच्या वास्तूला शोभेची वस्तू बनविण्यात नगर परिषद कोणत्याही प्रकारची कसूर ठेवत नाही आहे, एप्रिल आणि मे महिन्यात सकाळी शाळा झाली आणि सुट्ट्या लागल्या की सदर जलतरण तलावात विद्यार्थ्यांची रेलचेल राहत होती, पण या वर्षी जलतरण तलावाचे कुलूप सुद्धा उघडल्या गेले नसून अनेक विद्यार्थी, महिला, पुरुष यांच्याकडून विचारणा होत अस्तनांनाही नगर परिषद पदाधिकारी व प्रशासन मात्र आपल्याला काहीही देणेघेणे नाही अशी वागत आहे, सर्व गोष्टींचा विचार करता सामाजिक क्षेत्रात काम करणारी जलतरण संघटनेने मुख्याधिकारी संदीप दौडे यांना निवेदन दिले असून तलाव सुरू न केल्यास प्रसंगी नगर परिषद ला जागविण्यासाठी आंदोलनं करावे लागेल असा इशाराही दिला आहे, निवेदन देण्यासाठी किशोर कापगते, संजय चिंतावार, प्रवीण मोहूर्ले,प्रमोद कोकुलवार, निलेश रायकांठीवार, राजेश व्यास, गौतम जीवने, रज्जू कुरेशी यांची प्रमुख उपस्थिती होती



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!