महिलांना रोजगार देण्याच्या नावाने महिलांची लुबाडणूक - गाव माझा उद्योग फाउंडेशनचा कारनामा उघड

 

सावली - मुल एमआयडीसीत रोजगार मिळेल असे महिलांना प्रलोभन देत २ वर्षांपूर्वी प्रत्येक महिलांकडून एक हजार रुपये एका संस्थेकडून घेण्यात आले होते. मात्र एकाही महिलांना या संस्थेकडून रोजगार मिळाले नसल्याने आपली फसवणूक झाल्याची चर्चा सावली तालुक्यात आहे. 

        गाव माझा उद्योग फाउंडेशनचे प्रतिनिधी एक उद्योगाची माहिती  असलेले व सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांचे फोटो असलेले जाहिरात कार्ड महिलांना दाखवत आपल्या मुल एमआयडीसीत रोजगार देण्याचे आमिष दाखवीत होते. या संस्थेने पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी मधुकर वासनिक यांच्या उपस्थितीत पंचायत समितीच्या सभागृहात बचत गटातील महिलांची सभाही घेतली. याप्रकारे महिलांचा संस्थेने विश्वास संपादन केला. गटाच्या माध्यमातून गावोगावी बैठका घेत प्रत्येकी एक हजार रुपये घेत होते.  तालुक्यातील हजारो महिलांकडून लाखो रुपयाची रक्कम  वसुल करण्यात आली. मात्र दोन वर्षांपासून एकाही महिलेस रोजगार या संस्थेमार्फत मिळाला नसल्याने आपली फसगत झाल्याची चर्चा महिलांमध्ये आहे. गरीब महिलांना एक हजार रुपयासाठी हप्ताभर कष्ट घ्यावे लागत असल्याने हळहळत संताप व्यक्त करीत आहेत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!