“मुल शहर अर्ध रिकामं होणार? मुनगंटीवारांच्या वक्तव्यामागचं धक्कादायक कारण काय!”

"मालधक्का झाल्यास मुल शहराची अर्धी लोकसंख्या घटेल; कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही" – आमदार सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही


मुल, 18 एप्रिल: मुल शहरात प्रस्तावित मालधक्क्याला विरोध तीव्र होत असून, बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी "प्रदूषणामुळे शहराची अर्धी लोकसंख्या कमी होईल व प्रचंड मोठे नुकसान होईल, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शहरात मालधक्का होऊ देणार नाही" अशी ठाम ग्वाही दिली आहे.

मालधक्का विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी बल्लारपूर रेल्वे स्टेशन येथे आमदार मुनगंटीवार यांची भेट घेऊन प्रस्तावित मालधक्क्याविरोधात निवेदन सादर केले. यावेळी बोलताना मुनगंटीवार यांनी मुलवासीयांना आश्वस्त केले.

"मुल नगरपरिषदेने मालधक्क्याविरोधात ठराव घेतलेला आहे. त्यामुळे आपल्या मागणीला कायदेशीर बळ मिळाले आहे," असे सांगत आमदार मुनगंटीवार यांनी या ठरावाबद्दल समाधान व्यक्त केले.

या गंभीर प्रश्नावर लवकरच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन मुलमध्ये मालधक्का होऊ नये, याबाबत ठाम भूमिका मांडणार असल्याचे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.
कृती समितीचे जीवन कोंतमवार यांनी आमदारांच्या निदर्शनास आणून दिले की, "मुल शहरापासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर, याच रेल्वे मार्गावर केळझर येथे मालधक्का कार्यरत आहे. तरीही काही जण जाणीवपूर्वक मुल शहरात नवीन मालधक्का उभारण्याचा प्रयत्न करत आहेत."

शिष्टमंडळात यावेळी जीवन कोंतमवार, बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, अनिल मोगरे, विजय सिद्धावार, ॲड. प्रणव वैरागडे, ॲड. अश्विन पाॅलीकर, महेश गाजचलवार, कृउबास संचालक अमोल बच्चुवार, डेव्हिड खोब्रागडे, चंद्रपूर जिल्हा सहकार प्रशिक्षण केंद्राचे संचालक भोजराज गोवर्धन, विवेक मांदाडे, नितीन येरोजवार, आकाश कावळे, संदीप मोहाबे, श्रीकांत बुक्कावार यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!