मंगरूळ येथे स्वाब संस्थेच्या रक्तदान शिबिर 21 रक्तदात्यांनी केले रक्तदान




तळोधी (बा.):

      युवकांमध्ये रक्तदानाबद्दल जागृती निर्माण होऊन रक्तदानाचे महत्त्व कळण्याकरता व आपल्या परिसरातील आरोग्याच्या समस्या घेऊन गेलेल्या  ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना शहरांमध्ये नागपूर, चंद्रपूर, ब्रह्मपुरी, गडचिरोली सारख्या ठिकाणी शहरांमध्ये इकडे तिकडे न भटकता मोफत व वेळेवर रक्त उपलब्ध व्हावा व त्यांना रक्त गोळा करण्याकरिता अडचणी येऊ नये याकरिता 'स्वाब फाउंडेशन' सतत प्रयत्नशील असते. व गावांमध्ये रक्तदान शिबिरे घेऊन रक्त संकलन करून गरजूंना मोफत वर्षभर रक्त पूरवीत असते. तसेच आरोग्य शिबिर आयोजित करून आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटपाचे कार्यक्रम स्वाब संस्था वर्षभर राबवीत असते. आणि गरजूंना शहरांमध्ये एका फोन कॉलवर मोफत रक्तपुरवठा करीत असते.
      याच अनुषंगाने आज नागभीड तालुक्यातील मांगरुळ येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिर मध्ये एकूण 21 रक्तदात्यांनी रक्तदान केले. हे आयोजन हनुमान जयंती च्या निमित्ताने स्वाब नेचर केअर फाउंडेशन, व युवा मित्र मंडळ मागरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या रक्तदान शिबीर मध्ये नागपूर येथील जीवन ज्योती ब्लड बँक नागपूर या रक्तपेढी यांनी रक्त संकलन केले.
  या रक्तदान शिबिराच्या यशस्वीते करिता स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर, बचाव दल प्रमुख जिवेश सयाम, शैक्षणिक विभाग प्रमुख नितीन भेंडाळे, मागरुळ चे माजी ऊप सरपंच वैभव निकुरे, विनोद लेनगुरे, अमिर करकाडे, जिवन गुरनूले,आदित्य नान्हे, गणेश गावतुरे, सुरज नेवारे, गणेश गुरनुले, गोपाल कुंभले, शुभम निकेसर, यांनी या रक्तदान शिबिरा करीता परिश्रम घेतले. 
         यावेळी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र, भेटवस्तू म्हणून ट्रावलिंग बॅग, नाश्ता, देण्यात आला व या कार्यक्रमाचे आयोजनाबाबत जीवन ज्योती ब्लड बँक द्वारे स्वाब संस्थेला स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रक्तदान करणाऱ्या संपूर्ण रक्तदात्यांचे स्वाब संस्था व जीवन ज्योती ब्लड बँक च्या वतीने आभार मानण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!