वरोरा बाजार समिती मध्ये शासकीय आधारभूत दराने तूर व हरभरा खरेदीचा शुभारंभ

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
 
वरोरा : - कृषि उत्पन्न बाजार समिती, वरोरा अंतर्गत राजीव गांधी मार्केट यार्ड, वरोरा येथे एन.सी.सी.एफ मार्फत महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे तसेच कृषि उत्पन्न बाजार समिती, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय आधारभूत दराने तूर व हरभरा (चणा) खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमाला बाजार समितीचे सभापती डॉ. विजय रा. देवतळे यांची प्रमुख उपस्थितीत त्यांच्या हस्ते तूर व हरभरा (चणा) खरेदी प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी समितीचे संचालक बाळुभाऊ भोयर,  विजयराव मोकाशी तसेच सचिव चंद्रसेन शिंदे, सहाय्यक सचिव तथा शासकीय आधारभूत खरेदी केंद्रप्रमुख सचिन डहाळकर उपस्थित होते.यावेळी शेतकरी  मुर्लीधर हुलके,श्रावण हुलके, पवन हुलके रा. माढेळी यांनी शेतमाल हरभरा (चना) व प्रशांत खिरटकर मोखाळा यांनी शेतमाल तूर शासकीय आधारभूत दराने विक्री करीता आणलेली होती. तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी हरभरा (चना) व तूर घेवून येणाऱ्या शेतकऱ्यांचे शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांना शासकीय आधारभूत दराने हरभरा विक्रीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असल्याने त्यांना बाजारातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळणार असून आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होणार आहे. असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. व हरभरा (चना) व तूर खरेदी प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच आवश्यक कागदपत्राची माहितीही देण्यात आली.या उपक्रमामुळे वरोरा परिसरातील हरभरा (चना) व तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शासकीय हमीभावाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी  मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा, असे आवाहन वाजार समितीच्या वतीने करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!