राज्यस्तरीय ‘संविधान गुण गौरव’ परीक्षेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

अशोक गिरी यांना 'शतकवीर केंद्र समन्वयक' पुरस्काराने गौरविले; संविधान कार्यशाळेलाही मोठा प्रतिसाद

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दि.२३/०१/२०२६ संविधानिक आदर्श आणि मूल्ये जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने 'सुजान नागरिक मंच' अंतर्गत स्थापित 'संविधान गुण गौरव समिती'च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय संविधान गुण गौरव परीक्षेचा पारितोषिक वितरण व सन्मान सोहळा नुकताच जिल्हा परिषद सभागृहात दि.२२ जाने.रोजी उत्साहात पार पडला.याप्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत गुणवंत परीक्षार्थींचा आणि कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे नियोजन दोन सत्रांत करण्यात आले होते. सकाळच्या सत्रात 'संविधान कार्यशाळा' पार पडली, ज्यामध्ये संविधानातील मूलभूत तत्वे आणि नागरिकांची कर्तव्ये यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.दुपारच्या सत्रात मुख्य पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. मान्यवरांची उपस्थिती: कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संविधान गुण गौरव समितीचे अध्यक्ष अनिल मेश्राम होते.या सोहळ्याचे उद्घाटन माजी सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून समितीचे मार्गदर्शक नुरखाॅं पठाण, कार्याध्यक्ष डॉ.युवराज खोब्रागडे,डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कृत अमृता बन्सोड,माध्यमिक शिक्षणाधिकारी मनिषा गजभिये व इतर मान्यवर उपस्थित होते.अशोक गिरी यांचा विशेष सन्मान या परीक्षेच्या यशस्वी आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल आणि उल्लेखनीय कार्याबद्दल अशोक गिरी यांना ‘संविधान गुण गौरव परीक्षा शतकवीर केंद्र समन्वयक’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव होताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
उद्घाटक ई.झेड. खोब्रागडे यांनी आपल्या भाषणात संविधानातील मूल्यांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. "अशा परीक्षांच्या माध्यमातून नवीन पिढीमध्ये संविधानिक साक्षरता निर्माण होत आहे,ही कौतुकास्पद बाब आहे," असे मत त्यांनी व्यक्त केले. अध्यक्ष अनिल मेश्राम यांनी समितीच्या पुढील वाटचालीचा आढावा घेतला.
या कार्यक्रमाला नागरिक,विद्यार्थी आणि संविधान प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन समितीच्या वतीने करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!