वैजेश्वर मोक्षधाम मार्गावर नवनिर्वाचित नगराध्यक्ष विजया नंदुरकर यांचे भव्य स्वागत
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - नवनिर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरपरिषद अध्यक्षा विजया नंदुरकर यांचे पवनी शहरात उत्साहात स्वागत करण्यात आले. वैजेश्वर मोक्षधामकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावर आयोजित या स्वागत समारंभास राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच नगरपरिषद सदस्य यादवराव जी. भोगे, मनिषा ताई ज्ञानेश्वर जी. गोमासे यांच्यासह भाजपाचे नगरपरिषद सदस्यही प्रमुख उपस्थित होते.
या प्रसंगी माननीय नगराध्यक्षा विजया नंदुरकर यांनी शिवपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना त्यांनी पवनी शहराच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा मांडला. मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता व नागरी सोयी-सुविधांच्या विकासासाठी नगरपरिषद कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
शहराच्या विकासासाठी सर्व पक्षीय सहकार्य आवश्यक असल्याचे नमूद करत, जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या स्वागत समारंभामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!