सावित्रीबाई फुले विद्यालयाचे 'मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा' अंतर्गत मूल्यमापन



केंद्र स्तरीय समितीकडून समाधान व्यक्त; पुढील वाटचालीस शुभेच्छा


तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दि.०७/०१/२०२६ पवनी येथील सावित्रीबाई फुले विद्यालयात 'मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा' टप्पा-३ अंतर्गत ७ जाने.रोजी केंद्र स्तरीय समितीद्वारे विशेष मूल्यमापन करण्यात आले.या मोहिमेअंतर्गत शाळेने राबवलेले उपक्रम आणि शैक्षणिक वातावरणाची समितीकडून पाहणी करण्यात आली.
या मूल्यमापन प्रक्रियेसाठी समिती प्रमुख म्हणून सुनील धावळे व मानप्रकाश येळेकर उपस्थित होते. समिती सदस्यांनी विद्यालयातील विविध शैक्षणिक उपक्रम,स्वच्छता, पर्यावरणपूरक उपक्रम आणि विद्यार्थ्यांचा सहभाग यावर आधारित मुद्देनिहाय मूल्यमापन केले.शाळेतील शिस्त आणि राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांबाबत समितीने समाधान व्यक्त केले असून, विद्यालयाच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
असे झाले स्वागत:
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता गजभिये यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.त्यांनी विद्यालयामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती समितीला दिली.या प्रसंगी विद्यालयातील शिक्षक वृंद अशोक गिरी,ललिता डेकाटे,अरुणा कांबळे,अर्चना दडवे,विना जिभकाटे,सुमय्या शेख तसेच शालेय पोषण मदतनीस आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.मूल्यमापन यशस्वी करण्यासाठी संपूर्ण शालेय व्यवस्थापनाने सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!