विना नंबरची गाडी चालवणारा तो पोलीस कर्मचारी कोण? अधिकाराचा गैरवापर होत असल्याची सावलीत चर्चा



सावली (विजय कोरेवार) - 
"सदरक्षणाय.. खलनींग्रहणाय" हे पोलीस विभागाचे ब्रीदवाक्य असून कायद्याची अंमलबजावणी करण्याची फार मोठी जबाबदारी पोलीस विभागावर आहे. मात्र सावली पोलीस ठाण्यातील एक जबाबदार कर्मचारी हे विना नंबरची खाजगी कार राजरोसपणे चालवीत "हम करे सो कायदा" म्हणत कायदा मोडणारा तो पोलीस कर्मचारी कोण? हा कर्मचारी अधिकाऱ्यांच्या खास मर्जीतील मन"मोहून" टाकणारा असल्याने त्याचेवर लगाम कोण घालणार? अशा चर्चेला पोलीस विभागात उधाण आले आहे. 
        विना नंबर गाडी चालवणे हा एक कायदेशीर गुन्हा आहे, ज्यासाठी मोटार वाहन कायदा, १९८८ नुसार दंड, वाहन जप्ती आणि तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, कारण नंबर प्लेट वाहनाची ओळख असून सार्वजनिक रस्त्यांवर ती असणे अनिवार्य आहे. नुकतेच केंद्र सरकारच्या निर्देशानुसार वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (एचएसआरपी) लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. नंबर प्लेट नसल्यास वाहतूक पोलिसांकडून दंड आकारला जातो. अपघात, चोरी किंवा इतर कोणत्याही गंभीर प्रकरणाचा छडा लावण्यासाठी गाडीवरील नंबर प्लेट लावणे अती आवश्यक आहे. पोलीस अधिकारीचे वाहन असो की कोणत्याही वाहनास नंबर प्लेट असल्याशिवाय रस्त्यावर काढता येत नाही. मात्र सदर पोलीस कर्मचारी विना नंबर प्लेट असलेली पांढऱ्या रंगाची कार राजरोसपणे वापरत असल्याची चर्चा आहे. सावली ते गडचिरोली मार्गांवर दररोज ही कार चालताना दिसत असून विना नंबरची कार वापरण्याचा कोडं कुणाला समजलेलं नाही. मात्र आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करीत असल्याची व सदर पोलीस कर्मचारी ठाण्यातील जबाबदार अधिकाऱ्यांच्या खास मर्जीतील असल्याचे नंबर प्लेट व्यतिरिक्त अनेक किस्से चर्चील्या जात आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!