मूल नगर परिषदेचा कारभार नव्या नेतृत्वाकडे; ५ जानेवारीपासून लोकसेवक कार्यरत

मूल नगर परिषदेत नवनिर्वाचित लोकसेवकांचा पदग्रहण सोहळा ५ जानेवारीला


मूल :
मूल नगर परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत जनतेच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनामुळे काँग्रेस प्रणित आघाडीला यश मिळाले. या विजयाबद्दल जनतेचे आभार मानत, सोमवार दिनांक ५ जानेवारी २०२६ पासून नवनिर्वाचित लोकसेवक शहरसेवेचा अधिकृत कार्यभार स्वीकारणार आहेत.
या पार्श्वभूमीवर सोमवार दिनांक ५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १ वाजता मूल नगर परिषद प्रांगणात नवनिर्वाचित सर्व लोकसेवकांचा पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास शहरातील मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. एकता प्रशांत विलास समर्थ आणि काँग्रेस गटनेते राकेश य. रत्नावार यांनी दिलेल्या निमंत्रणात, जनतेच्या पाठिंब्यामुळेच हे यश मिळाले असून पुढील काळात मूल शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
पदग्रहण सोहळ्याला उपस्थित राहून नवनिर्वाचित लोकसेवकांना प्रोत्साहन द्यावे व या लोकशाही उत्सवाचे साक्षीदार व्हावे, अशी नम्र विनंती आयोजकांनी नागरिकांना केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!