संजीवन पर्यावरण संस्थेला ‘विदर्भवीर पुरस्कार २०२६’ प्रदान
संजीवन पर्यावरण संस्थेला ‘विदर्भवीर पुरस्कार २०२६’ प्रदान
नागपूर : वाईल्ड लाईफ वेलफेयर सोसायटी, नागपूर यांच्या वतीने दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी नागपूर येथील शिक्षक सहकारी बँक सभागृहात आयोजित विशेष समारंभात मूल (जि. चंद्रपूर) येथील संजीवन पर्यावरण संस्था यांना पर्यावरण संवर्धन व वन्यजीव संरक्षणाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘विदर्भवीर पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले.
या सन्मान सोहळ्यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून संजीवन पर्यावरण संस्था पर्यावरण जनजागृती, वृक्षारोपण, वन्यजीव संरक्षण, तसेच निसर्ग संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत असून त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारताना संस्थेच्या सदस्यांनी हा सन्मान संपूर्ण मूल तालुक्यातील पर्यावरणप्रेमी नागरिकांना समर्पित असल्याची भावना व्यक्त केली. या यशाबद्दल विविध स्तरातून संस्थेवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, संजीवन पर्यावरण संस्थेच्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!