खाजगी ट्रॅव्हल्सचा चकपीरंजी जवळ अपघात - विजय वडेट्टीवार यांनी घेतली अपघातग्रस्तांची भेट
सावली - चंद्रपूर कडून गडचिरोली जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने चकपीरंजी गावाजवळ अपघात झाला. त्यात अनेक जण जखमी झाले असून सावली, गडचिरोली दवाखान्यात उपचार सुरु आहे. दरम्यान गडचिरोली जिल्हा रुग्णालयात महाराष्ट्राचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी अपघातग्रस्तांची भेट घेतली.
चंद्रपूर कडून प्रवासी वाहतूक करणारी HKGN नावाची MH 04 GP 1736 ही खाजगी ट्रॅव्हल्स भरधाव वेगाने गडचिरोलीकडे जात असता चकपीरंजी जवळ गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स पलटी झाली. ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करणारे ४३ प्रवासी जखमी झाले. जखमीना ग्रामीण रुग्णालय सावली, सामान्य जिल्हा रुग्णालय गडचिरोली व इतर खाजगी दवाखान्यात उपचारासाठी भरती करण्यात आले. गडचिरोली येथील रुग्णालयातील रुग्णांची महाराष्ट्रातील विधानसभा गटनेते विजय वडेट्टीवार यांनी भेट घेतली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!