पारडी ग्रामपंचायत कर्मचारी चंद्रपूर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात उपोषणाला बसणार...




चौकशी करून सुद्धा अहवाल न मिळाल्याचा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी केला पत्रकार परिषदेत आरोप...



वरोरा.... जगदीश पेंदाम 

तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील पारडी येथील गटग्रामपंचायत अंतर्गत कार्यरत दोन कर्मचारी असुन यामध्ये श्रीकृष्ण तुरारे व राजेंद्र दाबेकर यांना सन २०२२ पासून ग्रामपंचायतीकडून दिल्या जाणारे २५ टक्के वेतन व ५० टक्के राणीमान भत्ता, भविष्य निर्वाह निधी, कोरोना काळातील प्रोत्साहन भत्ता मिळाले नसल्याचा आरोप पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी पंचायत समिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतरही न्याय न मिळत असल्याने सदर कर्मचाऱ्यांनी १६ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने संवर्ग विकास अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रातून पंचायत समितीसमोर १ जानेवारी ला कुटुंबासह उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. परंतु त्या आधीच २९ डिसेंबर ला विस्तार अधिकारी वरोरा  यांनी पारडी ग्रामपंचायतीत येऊन सदर प्रकरणाची चौकशी केल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचारी यांनी उपोषण मागे घेतले होते, विस्तार अधिकारी यांनी २ दिवसात चौकशी अहवाल देतो असे सांगून अद्यापही अहवाल वारंवार निवेदनाद्वारे मागणी करूनही देत नसल्या कारणाने  शेवटी आज दिनांक २४ जानेवारीला ग्रामपंचायत पटांगणा समोर पत्रकार परिषद घेवून दोन फेब्रुवारीला मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर येथे  कुटुंबासहीत उपोषणाला बसण्याचा इशारा ग्रामपंचायत कर्मचारीनी दिलेला आहे,
ग्रामपंचायत कर्मचारी श्रीकृष्ण तुरारे यांचे 3 लाख 96 हजार 930 रू. वेतन, राहणीमान भत्ता,तसेच भविष्य निर्वाह निधीचे 72 हजार 12 रुपये, राजेंद्र दाभेकर यांचे वेतन राहणीमान भत्त्याचे 3 लाख 98 हजार 406 रुपये थकीत असल्याचे  कर्मचाऱ्यांनी सांगितले, तसेच संबंधित ग्रामसेवक यांची या प्रकरणाची पूर्ण चौकशी होईपर्यंत बदली करण्यात येऊ नये अशी मागणी ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावकरी यांनी केली आहे. या वेळी उपस्थित रुपेश महादेव मोडक ग्रामपंचायत सदस्य, नितेश जुनघरे, गणेश मोडक सामाजिक कार्यकर्ता विठ्ठल बोदाने, महेंद्र भुते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!