शिवसेनेच्या सौ. आशाताई येरोजवार यांच्या उमेदवारीच्या चर्चेने प्रभाग ८ मध्ये राजकीय वातावरण तापले!
शिवसेनेच्या सौ. आशाताई येरोजवार यांच्या उमेदवारीच्या चर्चेने प्रभाग ८ मध्ये राजकीय वातावरण तापले!
मूल | प्रतिनिधी
मूल नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ८ मध्ये शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या) उमेदवार म्हणून सौ.आशाताई नितीन येरोजवार यांचे नाव सध्या जोरदार चर्चेत आहे.
शिवसेना बल्लारपूर विधानसभा संघटक श्री. नितीन येरोजवार यांच्या पत्नी असलेल्या सौ. येरोजवार या मूल शहरातील नामांकित संगणक प्रशिक्षण संस्थेच्या संचालिका आहे. शिक्षक कॉलनी शिवमंदिर संस्थेच्या उपाध्यक्ष आणि शिवसेना (उबाठा) जिल्हा महिला आघाडी सदस्य म्हणूनही त्या कार्यरत आहेत.
त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्यामुळे त्यांना प्रभाग ८ मध्ये विशेष ओळख मिळालेली आहे. नागरिकांच्या प्रश्नांवर संवेदनशीलपणे काम करणाऱ्या सौ. येरोजवार यांच्याकडे महिला वर्गाचा विशेष ओढा असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, श्री. नितीन येरोजवार यांनी गतकाळात शिवसेनेच्या माध्यमातून अनेक ज्वलंत सामाजिक आणि स्थानिक प्रश्नांवर आंदोलन करून जनतेला न्याय मिळवून देण्याचे कार्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाने निर्माण केलेला सामाजिक विश्वास आणि शिवसेनेशी असलेली बांधिलकी यामुळे प्रभागातील नागरिक सौ. आशाताई यांच्या मागे उभे राहत असल्याचे चित्र आहे.
स्थानिकांमध्ये अशी चर्चा आहे की, “जर सौ. आशाताई येरोजवार यांना उमेदवारी मिळाली, तर शिवसेना (उबाठा) पक्षाचा मुल नगरपरिषदेमध्ये नवा इतिहास घडेल.”
राजकीय चर्चांमुळे प्रभाग ८ मधील वातावरण चांगलेच तापले असून, शिवसेनेच्या या संभाव्य उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेच्या (उबाठा) ने नगराध्यक्षाचे उमेदवार जाहीर करून, मूलच्या स्थानिक राजकारणात आघाडी घेतली आहे. आता विधानसभा संघटकांनी आपली पत्नी नगर परिषदेच्या राजकारणात उतरविल्यांने, राजकीय धुराडा गडद झाले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!