प्रभाग ५ मध्ये युवक रूतीक गोयल यांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी दाखल
प्रभाग ५ मध्ये युवक रूतीक गोयल यांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी दाखल
प्रभाग क्रमांक ५ मधून नगरसेवक पदासाठी नुकतीच आपली उमेदवारी दाखल करताना युवक रूतीक गोयल यांनी स्थानिक पातळीवर आपली पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली आहे. रूतीक गोयल हे शिक्षित, तरुण आणि सुस्वभावी म्हणून परिसरात ओळखले जातात. समाजकार्यातील सहभाग आणि विविध स्थानिक उपक्रमांमधील सक्रिय उपस्थितीमुळे त्यांची जनसंपर्काची भक्कम पायाभरणी झाल्याचे बोलले जाते.
उमेदवारी जाहीर करताना रूतीक यांनी प्रभागातील मूलभूत सुविधा, तरुणांसाठी संधी आणि परिसराच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या मते, स्थानिक समस्यांबाबत नागरिकांशी थेट संवाद साधणे आणि त्यांचे समाधान शोधण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधणे हे स्थानिक प्रतिनिधींचे महत्त्वाचे कर्तव्य आहे.
प्रभागातील नागरिकांकडून विविध प्रतिक्रिया उमटत असल्या तरी तरुण चेहऱ्याला राजकारणात पुढे येण्याची संधी मिळाल्याचे काही रहिवाशांनी समाधानही व्यक्त केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!