मूलची कु.श्रीजा सुचित सहारेला सुवर्णपदक
मूल ची कु.श्रीजा सुचित सहारे ची सुवर्णपदक सह नेत्रदीपक कामगिरी व राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धे साठी निवड
महाराष्ट्र राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धा २०२५- २६ बारामती जिल्हा पुणे येथील स्पर्धेत
कु. श्रीजा सूचित सहारे सेंट अँन्स हायस्कूल मूल वर्ग ७वी तील विद्यार्थिनींनी राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत मूल तालुक्याचा मान उंचावून अभिमानाचा तूरा रोवला. उत्तम खेळाचे प्रदर्शन करीत सदर स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविला.
तिच्या नेत्रदीपक कामगिरी बद्दल तिचे सर्वत्र कौतुकाचे वर्षाव होत आहे. तिच्या उंच भरारी ला माना चा मुजरा.
मूल शहरातील शिरपेचात अभिमान मिळविला आहे.सदर स्पर्धेत राज्यातील अनेक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला त्यातील स्पर्धकांना नमवून तिने विजयश्री खेचून आणली ह्याचा सार्थ अभिमान आहे. राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धे साठी तिचे निवड झाली आहे .मूल तालुक्याचे व सेंट अँन्स हायस्कूल मूल चे नावलौकिक वाढविल्याबद्दल शाळेचे वतीने व मूल च्या सुपुत्री चे गुणगौरव होत आहे. लहानापासून कराटे ह्या खेळाची आवड जोपासत तिच्या परिश्रमाने व जिद्द व चिकाटीने
प्रशिक्षक इम्रान खान हयांच्या मार्गदर्शनात बहुमान मिळविल्या बद्दल कु. श्रीजा हिच्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा.
श्रीजा ही शहरातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व श्रमिकनगर स्थित श्री.विजयजी सहारे ह्यांची नात असून बबलू (सुचित)सहारे ह्यांची मुलगी आहे.
ह्या यशाबद्दल संदीप येनुगवार, योगेश कटकमवार, अनिल गिरडकर, अनिल पा. कुंटावार,पुरुषोत्तम बुरांडे,किशोर वडेट्टीवार, ह्यांनी कौतुक केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!