सावली तालुक्यात भोई समाज संघटनेची कार्यकारणी गठीत - अध्यक्षपदी क्रिष्णा राऊत यांची निवड

सावली :- सावली तालुक्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या भोई समाजाची तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली. समाजाच्या सामाजिक कार्यात पुढाकार घेणारे  युवा व उत्साही कार्यकर्ते क्रिष्णा राऊत यांची भोई समाज बहुउद्देशीय तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

             सावली तालुक्यातील भोई समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राऊत यांचे नेतृत्व मान्य करण्यात आले. नुकत्याच झालेल्या व्याहाड बुज येथील एकोरी माता मंदिर येथे झालेल्या विशेष बैठकीमध्ये निवड करण्यात आली.  सदर बैठक भोई समाजातील जेष्ठ कार्यकर्ते एकनाथजी ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आली या बैठकीमध्ये तालुक्यातील कार्यकारणी गठीत करण्यात आली. सचिवपदी राहुल भंडारे, व्याहाड खुर्द, उपाध्यक्षपदी अमोल कांबळे, उपरी, प्रल्हाद भोयर पेंढरी. सदानंदजी मारभते निफंद्रा नरेंद्र शेडमाके, पाथरी, सहसचिव संतोष गेडाम हरांबा हरिदास मेश्राम भट्टीजांब. दिपक साखरे, सायखेडा,  जनार्दन नागापूरे, मोखाळ, देवानंद भोयर, सामदा , संदीप भोयर, जिबगाव. संजय भोयर, विहिरगाव , नंदकिशोर माधव शिंदे, केरोडा संतोष कस्तुरे, सावली, संघटन प्रमुख नामदेव भोयर, व्याहाड बुज प्रसिद्धी प्रमुख  बालाजी बावणे, साखरी

महिला कार्यकारिणी

 सोनाली अरविंद भंडारे, उपाध्यक्षपदी सिमा कमलेश ठाकरे, सचिवपदी छायाताई दीपक शेंडे, यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर क्रिष्णा राऊत यांनी भोई समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी संकल्प व्यक्त केले.

मागील कारकिर्दीचा त्यांचा राजकीय इतिहास बघितला असता क्रिष्णा राऊत यांनी पंचायत समिती सावली चे सभापती पदाची सूत्रे हाती घेतली असता पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गावांचा विविध पैलुने विकास साधण्यात सिंहाचा वाटा होता.त्यांनी मागील पंचवार्षिक सत्रात भारतीय जनता पार्टीची धुरा सांभाळली होती सावली शहरासह गावपातळी पर्यंत आपल्या नावाचा डंका गाजवला होता. 

आज ते आपल्या पंचायत समिती मनरेगा चे सहकारी जवळीक मित्र नितीन दुवावार यांच्या वैचारिक नेतृत्वाने प्रभावित होत, आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली कांग्रेस पक्षात प्रवेश घेत जनहिताचा, जन विकासाचा दृष्टिकोन उराशी बाळगून आज कांग्रेस पक्षाचे सावलीचे शहराध्यक्ष पदाची धुरा सुद्धा हाती घेतली आहे. 

या बैठकीला सावली तालुक्यातील सर्व गावातील भोई समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नवीन कार्यकारणीचे आभार व्यक्त केले. 

या बैठकीचे सूत्रसंचालन मेश्राम सर प्रास्ताविक अरविंद भंडारे सर व आभार नामदेव भोयर यांनी मांनले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!