अपुऱ्या बस सुविधे अभावी शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय
लोकप्रतिनिधी यांना जनतेच्या समस्या दिसणार कधी?
रात्रीच्या सुमारास विद्यार्थ्यांना वन्यजीवापासून भीती
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - वरोरा तालुक्यातील शेगाव ( बु ) हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्याकरिता शिक्षणासाठी मुख्य गाव असून याठिकाणी नेहरू विद्यालय, संत काशिनाथ महाराज कन्या विद्यालय असून या ठिकाणी परिसरातील 70 ते 80 विद्यार्थी रोज शिक्षणासाठी येत असुन मागील चार महिन्यापासून बंद असलेली हिंगणघाट बस येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रशासनाच्या हरगर्जीपणामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे, प्रशासनाने पूर्ववत बस,अथवा पर्यायी व्यवस्था करा विद्यार्थ्यांची संबंधित प्रशासनाला मागणी केलेली आहे.
वरोरा तालुक्यातील वडगाव, आब, साखरा, वडधा, उमरी, चारगाव खु, येथील 70 ते 80 विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज शेगाव येथे येत असुन सकाळी गावावरून शेगावला आल्यानंतर शाळा सुटल्यानंतर सायंकाळी परत जाण्यासाठी या मार्गावर एकमेव वरोरा, शेगाव,वडगाव ही एकच बस असते व तीही सायंकाळी सहा वाजता असून नियमित वेळेवर येईलच असे नाही.त्यामुळे सायंकाळी साडेचार ते पाच वाजता शाळा सुटल्यानंतर या रूटवरील विद्यार्थ्यांना वडगाव बस चि वाट बघत राहावी लागते.सन 2025 ते 2026 चे शालेय सत्र सुरू होण्याआधी या रूटवर वर्धा तालुक्यातील हिंगणघाट परिवाहन विभागाची हिंगणघाट नंदोरी, कोरा, आब, वडगाव, शेगाव ही बस नियमित सकाळ व सायंकाळी सुरू असलेली बस मागील चार महिन्यापासून या बसची फेरी बंद करण्यात आल्यामुळे एकमेव वरोरा, वडगाव या बसवर संपूर्ण विद्यार्थ्यां शिक्षणासाठी प्रवास करत आहे, त्यातही दर सोमवारी ग्रामीण भागातील अनेक नागरिक बाजाराला येत असल्यामुळे कित्येक वेळा विद्यार्थ्यांना बसमध्ये जागा उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक विद्यार्थी प्रवासापासून वंचित राहत असतात.त्यामुळे विद्यार्थ्यांना रात्री हालटिंग बसची वाट बघावी लागते.
एकीकडे सगळीकडे मोठ्या प्रमाणात थंडीचे लाट असून बस ही प्रत्येक खेडोपाडी जात नसल्याकारणाने दिलेल्या टप्प्यावरून विद्यार्थ्यांना पायी थंडीत गावी जावे लागते तसेच ग्रामीण भागामध्ये झुडपे जंगला चे प्रमाण असल्यामुळे शेत परिसरात जंगली प्राण्यांचे वावर असल्यामुळे विद्यार्थ्यांचा सुरक्षित्तेचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन विद्यार्थ्यांसाठी बस सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
या संदर्भात हिंगणघाट शेडमाके बस स्थानक प्रमुख यांच्याशी फोनद्वारे विचारणा केली असता वडगाव ते खापरी हा रस्ता अत्यंत खराब असुन ठिकठिकाणी मोठे गड्डे व रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली मोठमोठे झाडे यामुळे बस येऊ शकत नाही असे त्यांनी सांगितले, त्यामुळे संबंधित प्रशासन लोक प्रतिनिधींनी,गावातील प्रतिनिधी यांनी रस्त्याची झाडे तोडून व पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमध्ये माती, मुरूम भरून व्यवस्था करून द्यावी आम्ही उद्याच बस सुरू करतो असे त्यांनी सांगितले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!