प्रभाग 2 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुसज्ज व्यक्तिमत्वाचे युवा नेतृत्व श्री. आकाश सुरेश ठाकरे मूल नगर परिषदेमध्ये आपला ठसा उमटविण्यासाठी रणांगणात उतरल्याने प्रभागामध्ये चर्चेला प्रचंड उधाण..



नगर परिषद मूलची 2 डिसेंबरला होणारी निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली असून प्रभाग क्रमांक 2 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दमदार युवा चेहरा म्हणून आकाश ठाकरे मैदानात उतरले आहेत.

सामाजिक बांधिलकी, लोकसेवा आणि सातत्याने जनतेच्या अडचणींना प्रतिसाद देणारे म्हणून आकाश ठाकरे यांची ओळख प्रभागात ठळक आहे. गरीब, दिनदुबळ्यांच्या मदतीसाठी नेहमी पुढाकार घेणारे, रुग्णांना मदत असो वा शैक्षणिक सुविधा—ते नेहमी लोकांसाठी उपलब्ध राहत असल्याने त्यांच्याबद्दल चांगला विश्वास निर्माण झाला आहे.

प्रभाग 2 मधील सर्वांगीण विकासाच्या मागणीला प्रतिसाद देत “नागरिकांच्या आग्रहास्तव मी रिंगणात उतरत आहे,” असे सांगत आकाश ठाकरे यांनी विकासाचा कामाचा दुजोरा देत  जनतेसमोर आपले मत स्पष्ट केले आहे. रस्ते सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक सोयीसुविधा या मूलभूत प्रश्नांवर ठोस काम करण्याचा त्यांनी संकल्प व्यक्त केला आहे.

प्रभाग क्रमांक २ मधील जनसामान्य मतदारांनी नवीन तडफदार, सस्नेही, तत्पर, म्हणून युवा नेते श्री. आकाश सुरेश ठाकरे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्प केला असल्याचे दिसून येत आहे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!