जागतिक गोंड सगा मांदी अर्जुनी कडुन महात्मा राजा रावण पूजन करून विजयादशमी साजरी
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - वरोरा तालुक्यातील अर्जुनी तु.येथे जागतिक गोंड सगा मांदी शाखा अर्जुनी तु. कडून महात्मा राजा रावण यांचे प्रतिमेचे पूजन करून दसरा उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी राजा रावण मडावी, आदिवासींचे धर्मगुरू कृपार पारोलिंगो यांच्या प्रतिमेला हार अर्पण पूजन करून सप्तरंगी झेंडा पुजन करून आदिवासी समाजाकडून विजयादशमी साजरी करण्यात आली.यावेळी उपस्थित शंकर सिडाम (अध्यक्ष) जागतिक गोंड सगा मांदी अर्जुनी कवडु येटे (सचिव) तथा अंकुश मडावी, माजी ग्रामपंचायत सदस्य,दिगांबर मरापे, राजू कुमरे, अशोक तोडासे,विनायक तोडासे, संदीप मडावी,समीर कुमरे, तथा तिरुमाय वैशाली कुळमेथे, कुमुद कुमरे, कांता कुळमेथे, अनिता तोडासे वैशाली कोडापे तथा सर्व आदिवासी गोंडियन समाज हजर होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!