अवैध दारू पुरवठा करणारा आकाश पाटील व विक्रेता संदीप मेश्राम या दोन दारू विक्रेत्यांवर भिसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमुर : - चिमूर तालूक्यातील भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा जांभुळघाट येथील संदीप निरांजने मेश्राम बाजार चौकात पान ठेल्यात नियमीत दारू विक्री करीत असल्याने १५ ऑक्टोबरला रात्रीला भिसी पोलीसानी पान ठेल्याची झडती घेण्यात आली.तपासनीन एका कागदी खोक्यात ४८ नग देशी दारूच्या सीलबंद बॉटल सापडल्या ज्याची किंमत ४ हजार ८०० रूपये होती.संदीप मेश्राम याने चौकसी दरम्यान सांगीतले की हा देशी दारू चा पुरवठा आकाश विनोद पाटील ऊफ्र आकाश भाई (रा.भिसी) यांनी केला आहे. यावरून दोघाविरूध्द भिसी पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.आकाश भाई हा मागील पाच-सहा वर्षा पासुन खुले आम अवैध दारू पुरवठा करीत आहे. यांच्यावर आता पर्यंत कोणतीही मोठी कार्यवाही पोलीस विभाग व उत्पादन शुल्क विभागा कडून झाली नाही.ही कार्यवाही उपविभागीय अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी ठाणेदार मंगेश भोंगाडे,पोउपनि.रविंद्र वाघ,पोउपनि.भारत थिटे, पोहवा.अजय बगडे आणि सतीश जीवतोडे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!