चिमुर तालूक्यात वन्यप्राण्यामुळे नागरीकांत भितीचे वातावरण

गाव तीथे वाघा चे दर्शन

मानव आणि वन्य प्राण्याच्या संघर्षात झाली वाढ

तालूका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)

चिमुर : - चिमूर तालूक्यातच नाही तर संपुर्ण जिल्ह्यामध्ये वन्य प्राण्याची भिती मोठया प्रमाणावर शेतकरी तथा गावाकऱ्यांमध्ये दाटल्याचे वातावरण पाहायला मीळत आहे.
  आठवड्यातुन जिल्ह्यात असो अथवा तालूक्यात वन्य प्राण्यामुळे जनतेला अपघातास सामोरे जावे लागत आहे. दैनंदिन वाघाचे शेतकऱ्यांवर होणारे हल्ले वाढतच चालले आहे. या घटना एक - दोन नाही तर अनेक घटना वाघा मुळे व इतर वन्य प्राण्यामुळे घडल्याचे चित्र बघायला मिळत आहे. मानवाचे व पाळीव प्राण्याचे बळी गेल्याची घटना नियमित बघावयास मिळत आहे. यामुळे नागरीक व शेतकऱ्या मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता तर गावा-गावा मध्ये वाघाचे दर्शन होताना पाहायला मिळत आहे. नियमीत कुठे ना कुठे वाघाने किंवा इतर प्राण्या द्वारे हल्ला करून मानव आणि पाळीव प्राणी ठार मारल्याची व जखमी केल्याची घटना समोर येत आहे. शेतकऱ्यानी शेता मध्ये जायचे तरी कसे असा प्रश्न शेतकऱ्यात निर्माण झाला आहे. एकिकडे अवकाळी पावसामुळे झालेली शेतकऱ्याची नुकसान व शेतातील पिकांचा बोजा सहन करावा लागत आहे तर दुसरीकडे वन्य प्राण्या मुळे शेतकऱ्याना अतिरीक बोजा सहन करावे लागत आहे. वाघाची व इतर वन्य प्राण्याची येवढी भिती वाढली आहे की शेतकरी आपल्या शेताची राखन किंवा शेतामध्ये जाण्याची हिम्मत करू शकत नाही. वन्य प्राण्या कडून झालेले नुसकान वनविभागा कडून पाहीजे तसी नुसकान भरपाई मीळत  नसल्याने नुसकान भरपाई चेहरा पाहून दिली जाते जसे काही अधीकारी व कर्मचारी आपल्या खिश्यातुनच देत आहेत अश्या प्रकारची वन विभागाची कार्यपध्दती चालू आहे.बरेश्या वन्य प्राण्या मुळे मानवाचे प्राण गेले व जखमी झालेल्या व्यक्तीना वन विभागा कडून आर्थिक मदत पाहीजे तसी मिळत नसल्याने अधिकारी व कर्मचारी वर्गा वर नागरीकांची तिव्र नाराजगी पाहायला मिळत आहे.दहा चक्रा मारून शुध्दा कुणा-कुणाला नुसकान भरपाई निळत नाही.वन्य प्राणाच्या धडकेत (अपघातात) असंख्य नागरीकांना जीव गमावावा लागला आहे.त्याना वन विभागा कडून कोणतीही आर्थिक मदत देण्यात आली नाही.शेकडो मानवाचे जीव गेले तरी चालेल पण एका वाघाचे किंवा वन्य प्राण्याचे जीव गेले नाही पाहीजे अश्या प्रकारचे धोरण वनविभागा कडून राबविले जात आहे. कधी-कधी असे अधिकारी मिळत असतात कि नागरीकांचे समाधान न करता उलट-सुलट बोलत असतात. दुसरीकडे जर एकाद्या अपघातात जर वन्य प्राण्याचे जीव गेला तर वाहन चालकावर वनविभागा कडून चौकसी करून गुन्हा नोंदवीला जातो अश्या प्रकारचे नियम वनविभागा राबविले जातात. शेतकऱ्यानी किंवा नागरीकानी करायचे तरी काय..?  अश्या प्रकारचे प्रश्न शेतकऱ्यात व नागरीकात पाहायला मिळत आहे. एक प्रकारे मानव व वन्य प्राण्या मध्ये मोठा सघंर्ष पाहायला मिळत आहे. जर वन विभागाने वन्य प्राण्याचे बंदोबस्त केले नाही तर येणाऱ्या काळात प्रत्येक ठिकानी आंबोली चौरस्ता येथे झालेल्या आंदोलना सारखेच आंदोलन घडतील. वन विभागा कडून वाघाचे व इतर प्राण्याचे बंदोबस्त करण्यात यावी.अश्या प्रकारची सर्वसामान्य नागरीक तथा शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!