महा आरती ने पवनी महोत्सवाला सुरुवात

मॅरथॉन दौड ठरले पवनी करीता आकर्षण

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - पवनी येथे आयोजित होत असलेल्या विदर्भ काशी पवनी महोत्सवाची सुरुवात शुक्रवारी महा  आरती ने करण्यात आली. माह आरती चे आयोजन पवनी येथील श्री चंडिका माता मंदिर येथे सायंकाळी करण्यात आले. तसेच आज सकाळी रंगोली स्पर्धा आयोजित करण्यात अली. या महोत्सवा अंतर्गत पाच दिवसीय विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. 
नवरात्रोत्सवाचे अवचित्य साधत 26 सप्टेंबर पासून पाच दिवसीय “विदर्भ काशी पवनी महोत्सव” सुरू करण्यात आला. आम. नरेंद्र भोंडेकर मित्र परिवरा तर्फे आयोजित या महोत्सव अंतर्गत शुक्रवारी सकाळी पवनी शहरात माह मॅरथॉन दौड आयोजित करण्यात अली, ज्यात 500 हूं अधिक स्पर्धकांनी भाग घेतला. ही दौड सकाळी 7 वाजता कालका माता मंदिर येथून सुरू करण्यात आली. ज्या करीता विविध वयोगट तयार करण्यात आले होते आणि यात विजेयी झालेल्या स्पर्धकांना स्मृतिचिन्हे व नगदी पुरस्कार देऊन सम्मानीत करण्यात आले. याच दिवशी सायंकाळी 6 वाजता महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. पवनी येथील श्री चंडिका माता मंदिर येथे महा आरती नी या महोत्सवाची सुरुवात करण्यात अली. या वेळी आम. नरेंद्र भोंडेकर यांनी उपस्थित राहून महोत्सवाचे उद्घाटन केले. महोत्सव दरम्यान शनिवारी सकाळी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या करिता संस्कार भारती आणि पोस्टर रंगोली असे दोन विभाग पाडण्यात आले होते, ज्यात विजयी स्पर्धकांना स्मृतिचिन्हे व नगदी पुरस्कार प्रदान करण्यात आले. सायंकाळी 7 वाजता सिने कलाकार व दि ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज शो चे विजेता सुनील पाल यांच्या कॉमेडी शो ने पवनी वासीयांना मनसोक्त हसविले. हा शो पवनी येथील नूतन दुर्गा उत्सव मंडळ चावडी मैदानात आयोजित करण्यात आला होता. 

माह आरोग्य शिबिर आज

महोत्सवाच्या दरम्यान रविवार 28 सप्टेंबर रोजी पेस हॉस्पिटल तर्फे संताजी सभागृह बेलघाटा वॉर्ड येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करून क्षेत्रातील रुग्णांची तपासणी आणि औषधोपचार करण्यात येणार आहे. सोबतच याच दिवशी सुपर मॉम, सुपर डॅड, एकल नृत्य तसेच सामूहिक नृत्य स्पर्धेचे आयोजन बेलघाटा वॉर्ड येथील संताजी सभागृहात करण्यात येणार आहे. ज्या करीता विविध बक्षीसे सुद्धा ठेवण्यात आली आहे. वरील आयोजनात नागरिकांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून आयोजनाचा लाभ घेण्याचे आवाहन आम. नरेंद्र भोंडेकर मित्र मंडळ, शिवसेना, युवा सेना तसेच महिला आघाडी द्वारे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!