सीडीसीसी बँक संचालकाचा मनमानी कारभार - बँकेत काम करणाऱ्या नावडत्या महिला प्रतिनिधीला कामावरून काढण्याचे आदेश
सावली - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा पाथरी येथे बचत गट संयोगिनी म्हणून तुटपुंज्या मानधनावर काम करणारी विधवा महिला प्रतिनिधी आपल्या मर्जीतील नसल्याने बँकेचे संचालक नंदाताई अल्लूरवार यांनी कामावरून काढण्याचा हट्ट धरला. बँकेच्या मासिक बैठकीत काढण्याचा ठराव केल्याने व्यवस्थापनाने कामावर न येण्याचे फर्मान काढले आहे. असा हट्ट करणे संचालक पदाला न शोभणारी आहे. मात्र सत्तेपुढे कुणाचे शहाणपण चालत नसल्याची प्रचिती आली आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर ही जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला बँकिंग सेवा पुरविण्याचे काम करते. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक व्यवहार करण्याचे काम, व्यवसाय या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्याचे काम बँकेच्या सहकार्याने झालेले आहे. महिलांना मार्गदर्शन व मदतीसाठी पाथरी शाखेत अंजुताई बोरेवार रा. पेंढरी ही बचत गट संयोगिनी या पदावर मागील सन २०११ पासून काम करीत असून सुरवातीला १ हजार रुपये मासिक मानधनापासून काम करीत आजघडीला ६ हजार रुपये मासिक मानधन आहे. मात्र या तुटपुंज्या मानधनावर काम करीत असलेल्या विधवा महिलेवर एका मध्यवर्ती बँकेच्या संचालकास आपल्या मर्जीतील नसल्याचे साक्षात्कार झाला आणि तिच्याबद्दल कुरघोडी करण्याचे कारस्थान सुरु झालेले आहे. या संचालकाच्या हट्टापायी अंजुताई बोरेवार हिला पदावरून हटविण्याचे आदेशच बँक व्यवस्थापकाकडून दिल्या गेले आहे.
बँक संचालकांचे कार्य हे आर्थिक विकासाच्या माध्यमातून जनतेला सक्षमीकरण करण्याचे असतांना राजकीय कुरघोडी करीत एका विधवा, तुटपुंज्या मानधनावर काम करीत असलेल्या महिलेला कामारून काढण्याच्या संचालकाच्या फर्मानामुळे जबादारीप्रति किती प्रामाणिक आहेत हे दिसून येत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!