चालत्या गाडीने घेतला पेट
वरोरा येथील आनंदवन चौकातील घटना
अनर्थ घडू नये यासाठी वरोरा पोलिसांची मोलाची कामगिरी
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - आवश्यक कामानिमित्त तीन जण मिळून काही आवश्यक कामानिमित्त नागपूरवरून MH 31 F U 6673 होंडाई अल्काझर या गाडीने चंद्रपूर ला गेले होते.परतीच्या प्रवासात गाडीत शॉर्ट सर्किट झाला ,धुव्वा निघायला लागला तर चालकाचे लक्षात आले.आणि गाडी आनंदवन चौकात तात्काळ थांबविण्यात आली. गाडीमध्ये असलेले तिघेही समयसूचकता ठेऊन गाडीचे दरवाजा उघडून बाहेर निघाले.मोठा अनर्थ टळला, कोणतीही जीवित हानी झाली नाही.सदर घटना 19 सप्टेंबर 2025 ला घडली दुपारच्या 02:45 दरम्यान घडली. वाहन मालक अमीन हजियानी ,कासिम मलिक ,चालक जुवेद अहमद हे तिघेही नागपूर वरून काही आवश्यक कामानिमित्त चंद्रपूर ला गेले होते.काम आटोपल्या नंतर ते नागपूर ला जाण्यासाठी निघाले असता गाडीमध्ये शॉर्ट सर्किट झाले आणि धुव्वा निघायला लागला हे चालक जुवेद अहमद यांचे लक्षात आले.आणि समयसूचकता ठेऊन आनंदवन चौकात त्वरित गाडी उभी ठेऊन तिघेही गाडीचे खाली उतरले .तर पाहता - पाहता गाडी पूर्णतः जळून खाक झाली.काही अनर्थ घडू नये यासाठी पोलीस विभागाने पूर्णतः दक्षता घेतली.आणि नगर परिषद वरोरा पॉवर च्या अग्निशमन दलाला पाचारण करून पूर्णतः आग आटोक्यात आणण्यात आली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!