सोईट ते कोहपरा मार्गावरील पुल झाला जीर्ण

जीर्ण झालेल्या पुलावरून नागरिक व विद्यार्थ्यांना ये - जा करणे झाले धोकादायक

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
     
वरोरा : - वरोरा तालुक्यातील सोईट ते कोहपरा हा एक किलोमीटर लांबीचा रहदारीचा रस्ता आहे.काही वर्षांपूर्वी या मार्गावर पुलाचे बांधकाम झाले.परंतु हल्ली या पुलाला भगदाड पडून सळाकी उघड्या पडल्या आहे.तसेच पुलाला सुरक्षा कठडे नसून पुलाला लागूनच वर्धा नदी लागलेली आहे.त्यामुळे नागरिकांना व किंबहुना विद्यार्थ्यांना सदर पुलावरून रहदारी करताना जीव मुठीत घेऊन जावे लागतात.लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन पुल बांधकाम व रस्ता दुरुस्ती बांधकाम करावे अशी नागरिकांनी मागणी केली आहे.
     गाव तिथे रस्ता या शासनाच्या धोरणाप्रमाणे गावे रस्त्याने जोडली आहे.रस्ते व पुलांची बांधकाम केली जातात.बांधकामे पूर्ण होऊन रस्ते रहदारीसाठी सज्ज होतात परंतु दोन आणि तीन वर्षात रस्ते उखडली उखडली जातात, पुलाना भगडद पडतात.त्यामुळे नागरिकांना रहदारी करतांना नाहक त्रास सहन करावा लागतो.वंधली - निलजई - आमडी - बोरी - कोहपरा - ते सोइट पर्यंतचे सर्व रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.गाव प्रशासन किंवा सुज्ञ नागरिक,सामाजिक कार्यकर्ते लोकप्रतिनिधी व प्रशासनाला रस्त्यांची समस्या सुटावी यासाठी वारंवार निवेदन देतात.परंतु लोकप्रतिनिधी अथवा सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देत नाही.अशा नागरिकांच्या प्रतिक्रिया उमटत आहे. सोईट ते कोहपरा हा एक किलोमीटर अंतराचा मार्ग असून या मार्गावर पुलाचे बांधकाम झाले असून भगदाड पडले आहे.सलाकी उघड्या पडल्या असून या मार्गाने कोहपरा गावचे शालेय विद्यार्थी हे सोईट येथील जी.प.हायस्कूल मध्ये शिक्षणासाठी येत असतात.पुल बांधकाम पूर्णतः जीर्ण झाले असून पुलाला लागूनच वर्धा नदी वाहते. पुलाला  सुरक्षा कठडे नसल्यामुळे ये - जा करणाऱ्या नागरिकांना किंबहुना विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन पुलाचे अंतर पार करावे लागते.लोकप्रतिनिधींनी व सार्वजनिक बांधकाम विभागाने नागरिकांना भेडसावणाऱ्या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्ते दुरुस्ती व जीर्ण झालेल्या पुलाचे नव्याने बांधकाम करून जनतेच्या सेवेत रुजू करण्यासाठी प्रयत्न करावे.अशी मागणी नीलजई, आमडी,बोरी,नवीन सोईट,कोहपरा, सोईट येथील ग्रामस्थांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!