चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय कर्मचार्यांना मोठा धक्का; नक्षलग्रस्त भत्ता आणि पदोन्नती रद्द, जून महिन्याचे वेतनही कपात!
चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय कर्मचार्यांना मोठा धक्का; नक्षलग्रस्त भत्ता आणि पदोन्नती रद्द, जून महिन्याचे वेतनही कपात!
चंद्रपूर | 3 जुलै 2025
चंद्रपूर जिल्ह्याला नक्षलग्रस्त जिल्ह्यांच्या यादीतून वगळण्याचा शासनाचा निर्णय जिल्ह्यातील शासकीय कर्मचार्यांसाठी धक्कादायक ठरला आहे. 27 जून 2025 पासून चंद्रपूर जिल्हा नक्षलग्रस्त यादीतून वगळण्यात आला असून, त्यामुळे कर्मचार्यांना मिळणारा नक्षलग्रस्त भत्ता तसेच एकस्तर पदोन्नतीचा लाभ रद्द करण्यात आला आहे.
यामुळे ना केवळ भविष्यातील आर्थिक लाभ थांबणार आहेत, तर जुन महिन्यातील उर्वरित 3 दिवसांचे वेतनही कपात करण्यात येणार आहे. यासंदर्भात सहायक जिल्हा नियोजन अधिकारी एच. एच. शेख यांनी वेतन कपात होणार असल्याची स्पष्ट हमी दिली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!