दादापूर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम संम्पन्न

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - वरोरा तालुक्यातील शेगाव बु येथून जवळच असलेल्या दादापूर या गावात 10 वि 12 वि मध्ये प्राविन्या प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन हनुमान देवस्थान कमिटी मार्फत केल्या गेले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाढई महाराज हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून हजारे सर (जि. प. शाळा दादापूर) दिलीप बोधणे, अमोल बोधणे, रामदास खाडे कु. स्नेहा नन्नावरे , सतीश कुंभारे, बाजीराव लेडांगे , मोरेश्वर नन्नावरे , नानाजी लेडांगे व समस्त दादापूर ग्रामवाशी उपस्थित होते. सत्कार कार्यक्रमात प्राध्यापक अमोल नन्नावरे (नेट - सेट ) याचा सत्कार करण्यात आला तसेच नवनियुक्त अंगणवाडी सेविका कु.स्नेहा नन्नावरे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच 10 वि मध्ये कोणतीही शिकवणी न लावता कु. भाग्यश्री वाघ, कु. ढरमयुरी नन्नावरे, कु.श्रावणी नन्नावरे तसेच 12 विचार मध्ये प्राविन्या प्राप्त कु. कोमल नन्नावरे कु, तनुजा राणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. अमोल नन्नावरेनी मंचावरून बोलनात शिक्षण क्षेत्रामध्ये भारीव कामगिरी करून समाजात शैक्षणिक क्रांती कशी आणता येईल याबाबत भाष्या करून उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन केले. तर बचत गटामार्फत गावात विकास घडवून आणण्यात महत्वाची कामगिरी बाजवीणाऱ्या सौ. जोत्स्ना नन्नावरे सौ. पुष्पा नन्नावरे सौ.सुशीला चौधरी सौ रसिका नन्नावरे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमर नन्नावरे यांनी केले तर आभार प्रदर्शन वसंत शेळकी यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!