जांभुळघाट - बोडदा रोडवर पट्टेदार वाघाने केली बैलाची शिकार
तालूका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)
चिमुर : - दि.08/06/2025 ला चिमूर तालूक्यातील जांभुळघाट - बोडदा रोड च्या बाजुला शेतामध्ये दोन बैल बांधून असलेल्या पैकी एका बैलाला वाघाने जाग्यावरच शिकार केली.हि घटना रात्री ला 12 ते 1 च्या दरम्यान घडली असुन बैल मालीक दिलीप ठिकरे रा.बोडदा हा शेतात घटनास्थळी असल्याने दुसऱ्या बैलाचा जीव वाचवण्यास यश आले.या घटनेची माहीती वनविभागास मिळताच शंकरपुर वनविभागा चे वनपाल विश्वनात पोरटे व वनरक्षक कालीदास गायकवाड हे घटना स्थळी येऊन पंचनामा करून पुढील चौकसी करीत आहे. शेतीचा हंगाम सुरू असताना शेतकऱ्याला मोठा संकट आला आहे.वनविभागा कडून नुसकान भरपाई तात्काल देण्यात यावी.अश्या प्रकारची मागणी शेतकऱ्या कडूण केली जात आहे.या परीसरा मध्ये शेतकरी व गावातील नागरीकांमध्ये भितीचे वातावन निर्माण झाले असुन वनविभागा कडून वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अश्या प्रकारची मागणी नागरीका कडूण होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!