सलग चारदा निवडून येत सावलीच्या नगराध्यक्षापदी साधनाताई वाढई
सावली - घरात कोणतेही राजकीय वारसा नसतांना, निवडणुकीत वारेमाप पैसा खर्च करण्याची ऐपत नसतांना केवळ जनेतेच्या संपर्कात राहून कामे करीत विश्वास संपादन केल्याने २००५ पासून सलग निवडणूक जिंकत साधनाताई वाढई या सावलीच्या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत.
वाढई कुटुंब हा घराणा राजकीय कुटुंबाचा नसतांना, या कुटुंबात जेमतेम एक एकर जमीन परंतु जनतेचे कामे करण्याची इच्छाशक्ती पाहून राजकीय पक्षांनी त्यांना ग्रामपंचायतमध्ये संधी दिली त्या पहिल्यांदा ग्रामपंचायत निवडणुकीत २००५ मध्ये निवडणूक लढवीत विजय मिळविला. त्यानंतरच्या २०१० च्या ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने अपक्ष निवडणूक लढल्या व जिंकल्याही. त्यानंतर नगरपंचायत स्थापन होऊन पहिली निवडणूक झाली त्यातही निवडणूक जिंकल्या. सन २०२१ च्या नगरपंचायत निवडणुकीत त्या चवथ्यांदा निडणूक जिंकल्या. तोच तोच चेहरा बघून मतदार नाकारतात मात्र साधनाताई सलग निवडणूक जिंकत आल्याने त्यांचे कौतुकच आहे. १० वर्षाच्या नगरपंचायत शासनात दोनदा साडेतीन वर्ष सभापती पदावर राहिल्या. नुकतेच आता सावली नगरपंचायतचे नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत. अजूनही छोट्याशा घरात राहत असतांना या राजकीय प्रवासात देवाप्रमाणे साथ दिली त्यांचे यजमान "ईश्वर" यांनी. नगराध्यक्ष पद या भागाचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार व संदीपभाऊ गड्डमवार यांच्या आशीर्वादाने मिळाल्याचे ते सांगतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!